युवा संवाद यात्रेचे विविध गावांत उत्स्फूर्त स्वागत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामीण विकासाचे उदाहरण ठरलेल्या संगमनेर तालुक्यात सध्या युवकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. कॅन्सर तज्ञ डॉ. जयभी धोरात यांच्या नेतृत्वाखाली युवकांची जनसंवाद यात्रा सुरू असून, या यात्रेचे स्वागत तालुक्यातील प्रत्येक गावात पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात होत आहे. विशेषतः युवकांमध्ये या यात्रेमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेली ही यात्रा तालुक्यातील धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी पश्चिम भागातील विविध गावांत मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. या युवक संवाद यात्रेत सुमारे दोन हजार युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले असून, प्रत्येक गावातील युवकांशी थेट संवाद साधला जात आहे. या यात्रेचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने होत आहे, आणि अनेक ठिकाणी जेसीबीमधून फुलांची उधळण करून यात्रेचे अभिनंदन करण्यात आले आहे.

यात्रेतील विशेष आकर्षण म्हणजे या कार्यक्रमात तरुणांच्या मोठ्या सहभागाबरोबरच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची देखील उत्स्फूर्त उपस्थिती. हेच या यात्रेचे यश मानले जात आहे. या प्रवासामुळे युवकांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण होत असून, त्यांना आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळत आहे.

जाहिरातीसाठी 9325024536

या वेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे संगमनेर तालुका आज राज्यात एक समृद्ध आणि प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याची सुसंस्कृत राजकारणाची परंपरा, सर्वधर्मसमभावाची जपलेली परंपरा, सहकार क्षेत्रातील यशस्वी प्रयोग, शिक्षण व्यवस्था, समाजकारण आणि शेतीतील प्रगती या सर्व बाबी राज्यातील इतर भागांसाठी आदर्श ठरल्या आहेत. निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करणे हे आमदार थोरात यांचे जीवनाचे ध्येय होते, आणि त्यांनी ते साध्य केले. या पाण्यामुळे दुष्काळी भागात समृद्धी आली असून, बाजारपेठाही फुलत आहे.

मात्र, तालुक्याचा हा सर्वांगीण विकास काही शक्तींना मान्य नसल्याचे डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दडपशाही विरोधात लढले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form