शहरातील जमजम कॉलनी परिसरात तीन बेकायदेशीर कत्तलखाने बिनधास्तपणे सुरू आहेत, आणि या कत्तलखान्यांमधून रोज मोठ्या प्रमाणात गोमांस हैदराबादला निर्यात होत असल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रकाराची माहिती मिळूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक लोकांमध्ये संताप वाढत आहे. शहरातील नागरिक आता पोलीस प्रशासन यावर कधी कारवाई करणार याची वाट पाहत आहेत.
कोल्हेवाडी रस्ता, जोर्वे रस्ता आणि जमजम कॉलनी या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून जमजम कॉलनी परिसरात तीन बेकायदेशीर कत्तलखाने कार्यरत आहेत. या कत्तलखान्यांमधून दररोज गोमांस दोन मोठ्या वाहनांमधून हैदराबादला पाठवले जाते, हे गंभीर प्रकार आहे. गोवंश कत्तल दोन वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये केली जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या कत्तलखान्यात दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कत्तल केली जाते, तर दुसऱ्या कत्तलखान्यात रात्री साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत कत्तल चालू असते.
गोवंश हत्याबंदी कायदा असूनही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कत्तलींवर कोणतेही निर्बंध लावले गेले नाहीत, आणि हे पाहून हिंदुत्ववादी संघटनांनी याविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. संघटनांचे कार्यकर्ते वारंवार गोहत्या बंदी कायद्याची आठवण करून देत कत्तलखाने बंद करण्यासाठी मागणी करत आहेत. यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, आणि दोन गटांमध्ये वादही झाले होते. या पार्श्वभूमीवर कत्तलखाने बंद करण्याची जोरदार मागणी झाली होती. मात्र, त्यानंतरही कत्तलखाने बंद होण्याऐवजी अजूनही सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या प्रकरणाने स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांना या कत्तलखान्यांवर बंदी घालण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या