आफ्रिकेसह 13 देशांमध्ये प्रादुर्भाव वाढतोय; हा आजार पाकिस्तानपर्यंत येऊ ठेपला

 मंकीपॉक्स विषाणूचा जगभरात प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे, आणि आतापर्यंत कांगोमध्ये 450 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. आता हा आजार पाकिस्तानपर्यंत येऊन ठेपला आहे, ज्यामुळे भारतीय सरकारनेही सुरक्षेच्या पावले उचलली आहेत. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी घोषित केले. मंकीपॉक्स (MPox) हा आजार अनेक देशांमध्ये पसरला असून, WHO ने सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

हा आजार अनेक कारणांमुळे पसरतोय, ज्यात प्राण्यांकडून माणसांमध्ये आणि माणसांकडून माणसांमध्ये संक्रमण होणे समाविष्ट आहे. तसेच, शरीरसंबंध ठेवल्यामुळेही मंकीपॉक्स पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर संक्रमित झालेला रुग्ण आढळला होता, ज्यामुळे मंकीपॉक्सच्या प्रसाराबद्दल चिंता वाढली आहे. सध्या कांगोमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसत असून, येथील 450 जणांचा मृत्यू झालेला आहे. याआधी आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी हा आजार रोखणे कठीण असल्याचे सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form