काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांच्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक म्हणजे राज्यभरात एक लाख शेततळी निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय. या योजनेतून संगमनेरसह अनेक तालुक्यांमध्ये जलक्रांती झाली. संगमनेर तालुक्यात सुमारे दहा हजार शेततळी निर्माण करण्यात आली, ज्यामुळे पाणीटंचाईग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या जलस्रोतांच्या उपलब्धतेमुळे शेतीचा विकास साधता आला असून, त्याचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी कृषीमंत्री पदावर असताना अनेक दिशादर्शक उपक्रम राबवले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी घेतलेला शेततळी निर्माणाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. याशिवाय त्यांनी "बांधावर बळी" हे कृषी विद्यापीठांचे अभियान सुरू केले, तसेच शिवार फेरी आणि महा पीक अभियान यासारखे कार्यक्रम सुद्धा यशस्वीपणे राबवले. या उपक्रमांमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले, जे त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यास कारणीभूत ठरले.
संगमनेर तालुका हा कायम अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु, थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेततळी योजनेमुळे येथील शेतकऱ्यांना पाण्याचा स्थायी स्रोत मिळाला. ठिबक सिंचनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी सुमारे 11,500 हेक्टरवर फळबागांची लागवड केली आहे. या पिकांमध्ये प्रामुख्याने टोमॅटो आणि डाळिंब या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे.
![]() |
जाहिरातीसाठी 9325024536 |
थोरात यांच्या इतर कार्यकाळात देखील त्यांनी राज्यभरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. महसूल मंत्री असताना त्यांनी ऑनलाईन सातबारा आणि शाळांमध्येच विद्यार्थ्यांना दाखले देण्याची योजना राबवली, ज्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजात सुलभता मिळाली. त्याचबरोबर त्यांनी ई-पीक पाहणी यंत्रणा सुरू केली आणि खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी "बेस्ट ऑफ फाईव्ह" हा निर्णय घेतला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यांकनात दिलासा मिळाला.
शेततळी योजनेतून निर्माण झालेल्या जलस्रोतांचा फायदा घेऊन संगमनेरच्या शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या नव्या तंत्रांचा अवलंब केला आहे. त्यातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा नियमित झाला आहे, ज्यामुळे पाण्यावर अवलंबून असलेल्या फळबागा आणि इतर शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. थोरात यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी केलेले कार्य आजही संगमनेरच्या शेतकऱ्यांच्या जीवनशैलीत महत्त्वाचे योगदान देत आहे.
या योजनांच्या माध्यमातून थोरात यांनी शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली आहे. शेतीला लागणारे पाणी साठवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली शेततळी ही दीर्घकालीन लाभ देणारी ठरली आहेत. त्यातून केवळ पाणीटंचाई दूर झाली नाही तर शेतीमध्ये नवनवीन तंत्रांचा वापर करून उत्पन्नात वाढ झाली. यामुळे संगमनेर तालुका जलक्रांतीचा एक उत्तम उदाहरण बनला आहे.
0 टिप्पण्या