तरुणीच्या अपहरण-धर्मांतरण प्रकरणात मुख्य आरोपींचा जामीन फेटाळला

संगमनेर तालुक्यातील पठारभागात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचे अपहरण, धर्मांतरण, आणि बळजबरीने निकाह करण्यात आलेल्या प्रकरणात मुख्य आरोपी युसुफ दादा चौगुले आणि आयाज अजिज पठाण यांचे जामीन अर्ज संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. आता या दोघांना औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. मात्र, मुंबईचा आदिल शब्बीर सय्यद याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

लव्ह जिहाद
दीड महिन्यापूर्वी दाखल झालेल्या या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र बळजबरीने निकाह करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणारे इतर आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाहीत. या घटनेत पीडित तरुणीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला होता. 

07 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे ही घटना घडली होती, जेव्हा युसुफ चौगुलेने पीडितेला मंचर येथे बोलावून तिचे अपहरण केले होते. नंतर तिला मुंबईला नेण्यात आले आणि तीन दिवस एका लॉजवर ठेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले. 9 जुलै रोजी तिचे बळजबरीने धर्मांतरण करुन निकाह लावण्यात आले. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर युसुफ चौगुले आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी जामीनासाठी अर्ज दाखल केला, परंतु न्यायालयाने मुख्य आरोपींचा जामीन फेटाळला. मात्र, आदिल सय्यद याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात अजूनही दोन आरोपींना पकडणे बाकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form