विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यावर चांगलेच लक्ष केंद्रीत केले असून आता कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत ते 'मिसळ पे चर्चा' करीत आहेत. त्यांनी शहरात सकाळीच येत साधलेल्या या संवादाची मतदारसंघात चर्चा आहे.संगमनेर तालुक्यात येताच मंत्री विखे पाटील यांनी आपला वाहनांचा ताफा तिकडे वळविला. मिसळचा आस्वाद घेताना तालुक्यातील राजकारणाबाबत काही टिप्सही दिल्या. संगमनेरची प्रसिद्ध जोशींची जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली. जोशींची जिलेबी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांची आवडीची होती, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. मिसळ, ताक आणि जिलेबी असा आस्वाद घेत मंत्री विखे पाटील यांनी साधलेल्या संवादाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मागील आठड्यात मंत्री विखे पाटील यांनी सलग तीनवेळा संगमनेर तालुक्याचा दौरा करत तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्याना सक्रीय होण्याचा संदेश दिला. विखे कुटुबियांशी अनेक वर्षे जोडल्या गेलेल्या ज्येष्ठांसह तरुण कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवादाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. या संवादाचा एक भाग म्हणून मंत्री विखे पाटील यांनी नवीन नगर मार्गावरील एका हॉटेलात मिसळ खाण्याचा आनंद घेतला. निळवंडे येथे कार्यक्रमाला जाताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते याच हॉटेलमध्ये मिसळ खाण्यास थांबले असल्याचे मंत्री विखे पाटील यांना समजले. कार्यकर्त्यानी त्यांना मिसळ खाण्यासाठी येण्याचा आग्रह केला
विकास कामांची उद्घाटने व इतर कामांच्या निमित्ताने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील काही गावात, संगमनेर शहरात संपर्क वाढवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संपर्क चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात 'मिसळ पे चर्चा' प्रयोगाने भर टाकली आहे.
0 टिप्पण्या