रस्त्यात दगड का टाकतात असे विचारल्यास महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिंपळगाव देपा येथील दोन कुटुंबात रस्त्याचा वाद आहे त्या रस्त्यामध्ये दगड का टाकता असे विचारल्यामूळ महिलेला मारहाण करत तिच्या पतीला धक्का बुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिलीय, ही घटना शनिवारी 17 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडलीय मंगल मधुकर गांजवे या आपल्या कुटुंबासह पिंपळगाव देपा या ठिकाणी राहतात आणि शेती व्यवसाय करतात. तर त्यांच्या घराशेजारी राहणारे भावबंद साहेबराव सीताराम गांजवे यांच्या सोबत ये जा करण्याच्या रस्त्यावरून त्यांचा वाद आहे, शनिवारी सायंकाळी मंगल आणि त्यांची सून दिव्या शेतातील काम आटोपल्यानंतर घरी चालले होते, त्यावेळी रस्त्यामध्ये साहेबराव गांजवे आणि त्यांचा भाऊ विलास गांजवे हे जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यामध्ये दगड टाकत होते मंगल यांनी त्यांना रस्त्यामध्ये दगड का टाकतो असे विचारल्यानंतर त्याचा राग येऊन साहेबराव यांनी मंगल यांच्या कानामागे चपलेन मारलं आणि त्यांचा भाऊ विलास यांनी लज्जास्पद वर्तन करत त्यांना खाली पाडलं त्याच वेळी मंगल यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने त्यांचे पती मधुकर सोडवण्यासाठी आल्यास असता.
विलास यांचा मुलगा अभिजीत आणि साहेबराव यांची पत्नी शोभा यांनी त्यांना धक्का बुक्की करत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी देखील दिली यामध्ये मंगल यांच्या कानातील एक तोळ्याची कर्णफुल गहाळ होऊन नुकसान झालंय अशी फिर्याद मंगल मधुकर गांजवे यांनी घारगाव पोलिस ठाण्यात दिलीय तर या प्रकरणी मंगल मधुकर गांजवे यांनी साहेबराव सीताराम गांजवे, विलास सीताराम गांजवे, अभिजीत विलास गांजवे, शोभा साहेबराव गांजवे यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय.
0 टिप्पण्या