थायलंडमध्ये गाजतोय आपल्या संगमनेर मधील चंदनेश्वर विद्यालयाचा डंका

थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक आणि पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले.  

या स्पर्धेत 52 संघांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमनेर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजनदादा शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षितपणे नेण्या-आणण्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारत त्यांना प्रोत्साहन दिले. नृत्य शिक्षक विश्वजीत देशमुख आणि उपप्राचार्य के. जी. राहणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजनदादा शिंदे, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे, उपाध्यक्ष रामदास राहणे, खजिनदार विठ्ठलराव कढणे, सेक्रेटरी अनिल कढणे, सह सेक्रेटरी अशोकराव रहाणे, नरेंद्र राहणे, रजिस्ट्रार एम. एम. फटांगरे, आणि जल जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे यांनी केले आहे.


जाहिरातीसाठी संपर्क करा aaplsangamnerr@gmail.com 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form