संगमनेरमध्ये महिलांचा आक्रोश मोर्चा: बदलापूरच्या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध

बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आणि या कृर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर येथे जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन आणि सर्व महिला मंडळाच्या वतीने आज आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 

या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी सहभागी होऊन या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. अशा अमानवीय घटना समाजात निर्माण होऊ नयेत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महिलांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला. या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत, समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. 
मोर्चादरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या, ज्यातून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी मोर्चामध्ये सहभागी होत, महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याची ग्वाही दिली. 
उपस्थित महिला भगिनींनी आपल्या संपूर्ण पाठिंब्याचे आश्वासन देत, या मुद्द्यावर एकत्र राहून संघर्ष करण्याची तयारी दर्शवली. मोर्चाने समाजाच्या विविध स्तरांमध्ये या गंभीर घटनेबद्दल जागृती निर्माण केली आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form