सुजय विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुध्दा होणार नाहीत

डाॅ. सुजय विखे पाटील यांची आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर कडवट टीका

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील राजकारणाचा आढावा घेताना, डॉ. सुजय विखे पाटील यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली. "आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे," असे म्हणत त्यांनी तालुक्यात मोठे परिवर्तन होणार असल्याचे सांगितले. महिलांचा या परिवर्तनात महत्त्वपूर्ण वाटा असेल, तसेच युवकांनीही तालुक्यातील भयाचे वातावरण झुगारून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. विखे पाटील यांनी ठेकेदारी संस्कृतीवर टीका करताना सांगितले की, "ठेकेदार संस्कृती तुमचा विकास करू शकत नाही."

विखे पाटील यांनी थोरातांच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न यंदा पूर्ण होणार नाही, असे म्हणत तेथील जनतेला आश्वासन दिले की तालुक्यातील सत्ता बदल होणार आहे. "चाळीस वर्षांपासून तालुक्याला मोठी पदे मिळाली, परंतु तालुक्यात विकासाच्या दृष्टीने काहीच झाले नाही," असे विखे पाटील यांनी ठासून सांगितले. त्यांनी तळेगाव येथे ४४ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा केला आणि निळवंडे धरणाचे पाणी तालुक्यात आणले गेले, हे देखील त्यांनी सांगितले. विखे पाटील कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन हे काम पूर्ण केले, अशी माहिती त्यांनी दिली.

युवा संकल्प मेळाव्यात बोलताना विखे पाटील यांनी थोरातांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रखर टीका केली. "वर्षानुवर्ष महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्यात हे नेते अपयशी ठरले आहेत, त्यांच्याकडून कोणता विकास होणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी तालुक्यात नातेवाईकांपुरते राजकारण केले, असा आरोप करत ठेकेदारी आणि जमिनीचा ताबा मिळवणे एवढीच त्यांची ओळख असल्याचे सांगितले. तळेगाव आणि निमोण भागातील युवकांनी मात्र या मातीची शान राखून परिवर्तन घडवून आणले, आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच परिवर्तन घडवायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

जाहिरातीसाठी 9325024536

विखे पाटील यांनी ठासून सांगितले की दोन दिवसांत पक्षाचा निर्णय होईल आणि संगमनेर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येईल. त्यांनी आ. थोरात यांच्यावर निशाणा साधत, "एकाच घरात सत्ता ठेवणाऱ्यांची मनमानी आता संपली पाहिजे," असे ते म्हणाले. "आमचे कार्यकर्ते शिवरायांचे मावळे आहेत, ते पैशाच्या पाकीट संस्कृतीत वाढलेले नाहीत," असा घणाघात करत त्यांनी थोरातांच्या दहशतीचा समाचार घेतला.

विखे पाटील यांचे लोहारै कासारे येथे जोरदार स्वागत करण्यात आले. सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी विखे पाटील यांनी स्पष्ट केले की त्यांना तिकीट नाकारल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. "सूत्रांवर विश्वास ठेवू नका," असे आवाहन करून त्यांनी संगमनेर मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात जाणार असल्याचे ठामपणे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form