माजी मंत्री मधुरकराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात उपचार सुरु



भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नाशिकच्या नाईन प्लस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. ८४ वर्षीय पिचड यांना पहाटे राजूर येथील निवासस्थानी असताना अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची विविध तपासण्या केल्या. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी त्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांच्या एका टीमने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
मधुकरराव पिचड यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची बातमी कुटुंबियांसह भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या पुत्र माजी आमदार वैभव पिचड व इतर कुटुंबीय रुग्णालयात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form