साकुर या ठिकाणी वैभव दत्तात्रय आमले वय वर्ष 22 आणि स्नेहा वैभव आमले वय वर्ष 20 या नवविवाहित दांपत्याने रविवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीजवळील मळ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे साकुर पठार भागात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि साकुर गावचे ग्रामस्थ घटनेस्थळी धाव घेत त्यांनी या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोच झाले या घटनेचा पंचनामा केला असून ही घटना कश्यामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही, दरम्यान तीन महिन्यापूर्वी हे विवाहबद्ध झाले होते. दोघेही पुण्यामध्ये नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकुरला आले होते या नव्या विवाहित जोडप्याचा कोणी घातपात केलाय की त्यांनी खरंच आत्महत्या केलीय ह्या दृष्टीने घारगाव पोलिस तपास करताय DYSP सोमनाथ वाघचौरे हे या प्रकरणी विविध बाबी पडताळून पाहताय.
0 टिप्पण्या