स्वातंत्र्यदिनी संगमनेर कोपरगाव महामार्गावरील खड्यांमध्ये वृक्षरोपण करत अनोखी गांधीगिरी

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रशासनाला जाग आणण्यासाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबून, महामार्गावरील रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. संगमनेर आणि कोपरगाव या दोन प्रमुख तालुक्यांना जोडणाऱ्या प्रचंड रहदारीच्या महामार्गावर, रांजणगाव देशमुख आणि भागवतवाडी शिवाराच्या परिसरात मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज दोन ते तीन प्रवाशांचे अपघात होत आहेत. 

15 ऑगस्टला या परिसरातील नागरिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र शासनाचा निषेध केला. नागरिकांनी लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे, अन्यथा मोठ्या आंदोलनाची चेतावणी दिली आहे. या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी रयत शेतकरी संगमनेर तालुका उपाध्यक्ष शरद भागवत आणि ग्रामस्थांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form