संगमनेरमधील सोनोशी गावचे भूमिपुत्र हरिभाऊ गीते राज्याचे जलसंधारण विभागाचे सहसचिव

संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावचे भूमिपुत्र आणि राज्याच्या मृद व जलसंधारण खात्यातील नाशिक विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांना राज्याच्या जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता तथा पदसिद्ध सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यामुळे सोनोशी गावातील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. सोमवारी, 12 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला. 

हरिभाऊ गिते यांना नुकतीच नाशिक विभागाच्या प्रादेशिक जलसंधारण अधिकारी म्हणून बढती मिळाली होती. त्यांनी राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी "जलयुक्त शिवार 2" योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" या अभियानालाही त्यांनी गती दिली. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचा मानस त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला. हरिभाऊ गिते यांना पदसिद्ध सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाल्यामुळे मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form