निगडीमधील दुर्गा टेकडीवर एक गंभीर आणि संतापजनक घटना घडली आहे, जिथे एका तरुणाने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत पीडित मुलीच्या १५ वर्षीय मैत्रिणीने देखील संशयित आरोपीला मदत केली होती. आरोपीने पीडित मुलीला दुर्गा टेकडीवर नेण्यापूर्वी तिला आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मुलीने या घटनेची कोणालाही माहिती दिली नाही. मात्र, अत्याचारामुळे ती दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हे समजताच, पीडित मुलीच्या आईने तातडीने निगडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान घडलेल्या या घटनेत पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिला धमकावत दुर्गा टेकडीवर नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीच्या धमक्यांमुळे आणि भीतीमुळे पीडित मुलगी गप्प राहिली, मात्र गरोदर राहिल्यानंतर हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे.
0 टिप्पण्या