सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अत्यंत शिस्तबद्ध, काटकसरी, पारदर्शक, आणि रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे पालन करीत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे सिद्ध केले आहे. या बँकेच्या कार्यप्रणालीने तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळाला आहे, अशी गौरवोद्गार माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढली. ही सभा बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, मधुकरराव नवले, आर बी राहणे, ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक किसनराव सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, ॲड. लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी, अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, प्राचार्य विवेक धुमाळ, किसनराव वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, कमल मंडलिक, ललिता दिघे, उबेद शेख, राजू गुंजाळ, गोरख कुटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोरात यांनी सभेत बोलताना सांगितले की, आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीच चांगल्या होत असतात, कारण सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन प्रगतीची चर्चा करतात. रिझर्व्ह बँकेच्या कठोर नियमांचे पालन करत, अमृतवाहिनी बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे शेतकरी आणि गरीब लोकांना मोठी मदत झाली आहे. विशेषतः, कर्ज वितरण करताना परतफेड होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेच्या आठ शाखा सध्या कार्यरत असून, लवकरच राहाता आणि निमोण येथेही शाखा सुरू केल्या जाणार आहेत.
आमदार थोरात यांनी दूध संघाच्या वतीने उत्पादक शेतकऱ्यांकरिता कमी दराने आठ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उदाहरण दिले. या कर्जामुळे अनेक दूध उत्पादकांना उत्पादन वाढविण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर, साखर कारखान्याच्या सहकार्याने आता अमृत विजय सोलर कृषी पंपासाठी योजना दिली जाणार आहे. संगमनेर तालुक्यात सुमारे दहा हजार शेततळे आहेत, आणि या शेततळ्यांवर सोलर पंप बसवल्यास ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आणखी फळबागा आणि पिके फुलवता येणार आहेत.
आर्थिक नियोजन, काटकसर, आरबीआयच्या सर्व निर्बंधांचे पालन, संगणकीकरण आणि तात्काळ सेवांचा लाभ घेत, अमृतवाहिनी बँकेने आर्थिक वर्षात 800 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केले असल्याचे थोरात यांनी सांगितले. डॉ. तांबे यांनी आपल्या भाषणात राज्यात जवळपास 2000 सहकारी बँका असल्याचे नमूद केले, ज्यापैकी 500 बँका चांगल्या नेतृत्वाच्या अभावामुळे बंद पडल्या आहेत. परंतु, ज्या ठिकाणी चांगले नेतृत्व आहे, तिथे सहकाराच्या माध्यमातून गरीब आणि शेतकऱ्यांना मदत होते. संगमनेर तालुक्यातील सहकार हा देशासाठी पॅटर्न ठरला असून, बँक आणि इतर सहकारी संस्थांची वाटचाल कौतुकास्पद ठरली आहे.
अध्यक्ष सुधाकर जोशी यांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेने आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना उत्कृष्ट नियोजन केले असल्याचे आणि शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचे सांगितले. बँकेचा लौकिक आता राज्य पातळीवर पोहोचला असून, आगामी काळात अमृत मिलेनियर ठेव योजना आणि अमृत विजय सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ सभासद आणि शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले.
सभेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील सहकाराच्या यशाचे कौतुक करताना, "देशातील सहकाराच्या इतिहासात संगमनेरचा सहकार देशासाठी आदर्श आहे," असे नमूद केले. त्यांनी सांगितले की, चांगले नेतृत्व असल्याने संगमनेरचा सहकार हा देशभर पसरला असून, त्याचा आदर्श घेत अनेक सहकारी संस्थांनी प्रगती साधली आहे. त्यांनी बँकेच्या कामकाजाचे कौतुक करताना, "अमृतवाहिनी बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे," असे म्हटले.
सभेचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केले, आणि सभेचे आभार प्रदर्शन ॲड. नानासाहेब शिंदे यांनी केले. आमदार थोरात यांचा स्वातंत्र्यप्राप्तीसह देशहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या सर्वोच्च राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर निवड झाल्याबद्दल अमृतवाहिनी बँकेच्या वतीने गौरव करण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी अमृत विजय कृषी सौर पंप योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा सुलभ होईल. यासोबतच, अमृत मिलेनियर ठेव योजना जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये पाच वर्षे आणि दहा वर्षांच्या ठेवीतून सभासदांना आकर्षक व्याजदर मिळणार आहेत. या योजनेचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने क्लिक करून करण्यात आला,
0 टिप्पण्या