जमिनी बळकावल्या प्रकरणी थोरात यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले की त्यांना याबद्दल माहिती नाही हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे

 संगमनेर आणि अकोले तालुक्यातील जमिनींच्या खरेदी-विक्रीतून उघड झालेल्या प्रकरणात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित असलेले आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांवरील पदाधिकारी अडकल्याचे दिसून येत आहे. थोरात यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले की त्यांना याबद्दल माहितीच नाही, हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. 


काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे नाव या प्रकरणात समोर आले असले तरी, बडे उद्योजक आणि त्यांचे साथीदार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चालवलेल्या जमीन गैरव्यवहार कसा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संगमनेर - अकोले तालुक्यातील या वादग्रस्त प्रकाराची माहिती उघड झाल्यावर अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दाखल झाल्या असल्या तरी, अद्याप या तक्रारींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट, कारवाई होण्याच्या मार्गात अडथळे आणले जात असल्याचे दिसून येत आहे.संगमनेर आणि अकोले तालुक्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने जमीन खरेदी-विक्रीचा उद्योग चालवला असून, आदिवासी, वन, शर्तीच्या, राखीव जमिनींच्या बाबतीत बिनधास्त व्यवहार करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या मदतीशिवाय हे उद्योग शक्य नव्हते.

महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी 'लँड माफिया'च्या साथीने संगमनेर अकोले तालुक्यात हे उद्योग केले आहेत. या प्रकरणात दादागिरीसह महसूल, भूमी अभिलेख, आणि वनविभागातील महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांना लाभ देऊन लँड माफियांनी आपले काम साधले आहे. यात सत्तेतील बड्या नेत्यांच्या नातेवाईकांचा मोठा सहभाग आहे. महसूल विभागातील काही निवृत्त अधिकारी आणि काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन मंत्रालयात बसून हे उद्योग चालवले असल्याचीही चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form