श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशाने संगमनेरमध्ये घेतला गळफास

श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशा पिंकी शेख हिने संगमनेर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आयशा शेख काही दिवसांपासून संगमनेरमधील जोर्वे रस्त्यावरील एकतानगर मध्ये रिया, कविता, प्रियांका, आणि शंतनु यांच्यासोबत राहत होती. श्रीरामपूरहून आल्यानंतर ती तणावात होती. १४ ऑगस्ट रोजी रात्री संगमनेर येथील वाबळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे औषधोपचार घेऊन आल्यानंतर ती रिया आणि कविता यांच्यासोबत एकतानगर मधील घरी थांबली होती.

त्या दोघींना काहीतरी आणण्यासाठी गावात पाठवल्यानंतर, परत आल्यावर त्यांनी दरवाजा बंद असल्याचे बघितले. खिडकीतून पाहिल्यावर आयशाने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काही लोकांच्या मदतीने दरवाजा उघडून आयशाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक सुजाता थोरात करत आहेत.


जाहिरातीसाठी संपर्क करा aaplsangamnerr@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form